युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याचे संविता आश्रम पणदूर येथील मुलांना चित्रकलेचे धडे गणपतीसमोर जमलेली रक्कमही दिली आश्रमाच्या सामाजिक कामासाठी

0
209

 

सिंधुदुर्ग – युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने आपल्या कलेतून नेहमीच सामाजिक भान जपताना ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवले आहेत. नुकतीच त्याने पणदूर येथील संविता आश्रमाला भेट दिली आणि त्याठिकाणच्या मुलांना कोणताही मोबदला न घेता चित्रकलेचे ज्ञान दिले. एवढ्यावरच न थांबता त्याने आपल्या गणपती बाप्पासमोर जमलेली देणगी आश्रमाच्या सामाजिक कामासाठी दिली. आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांनी अक्षयच्या या दातृत्व भावनेबद्दल त्याचे आभार मानले.

अक्षय मेस्त्री हा देवगड तालुक्यातील गावाने गावचा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तो शिकला. कोल्हापूर येथून कला शिक्षकाची पदवी संपादन केल्यानंतर त्याने आपल्या गावाकडे दाखल होत कला जोपासतानाच त्याने सामाजिक भान राखत विविध सामाजिक उपक्रमाला सुरवात केली. गणेश चतुर्थीला त्याच्याही घरात बाप्पा बसतो मात्र हा सणही तो सामाजिक भावनेतून साजरा करतो. या वर्षी त्याने आपले नातेवाईक, मित्र परिवार याना आवाहन केले होते कि, माझ्या घरी बाप्पाच्या दर्शनाला येताना कोणीही अगरबत्ती किंवा मोदकाचे पाकीट आणू नका, त्याऐवजी बाप्पासमोरच्या दानपेटीत आपल्याला शक्य असेल तेवढी रक्कम टाका. हि रक्कम आम्ही मुलांच्या भवितव्यासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी वापरू. त्याच्या या आवाहनाला अनेकांनी हातभार लावला. फंडपेटीत काही रक्कम जमा झाली. हि रक्कम घेऊन अक्षय संविता आश्रम पणदूर येथे दाखल झाला. त्याने ती रक्कम आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांच्या हाती सुपूर्द केली.

एवढ्यावरच न थांबता आपल्या कलेचे ज्ञान येथील मुलांना दिले पाहिजे या भावनेतून त्याने स्वतः नेलेल्या कॅनव्हासवर येथीलच स्वागत कक्षाचे लाईव्ह चित्र इथल्या मुलांना रेखाटून दाखवले. अक्षयच्या चित्राने इथली मुले भारावून गेली. प्रत्यक्ष चित्रकार चित्र रेखाटतो आहे आणि आपल्याला तो ते कस रेखाटतो हे प्रत्यक्षात पहायला मिळतंय याचा आनंद येथील मुलांच्या चेहऱ्यावर पहायला मिळत होता. अक्षय याबाबतीत म्हणाला आज मुलांच्या मध्ये दडलेले विविध कला गन ओळखून त्याला वाव देण्याची गरज आहे. याच भावनेतून मी या ठिकाणी आलो. मुलांना मी माझ्यापरीने कमी वेळात माझ्यातल्या कलेच ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे हि मुल खूप हुशार आहेत, ती या आश्रमाच नाव नक्कीच उज्वल करतील अस मला वाटत असही तो यावेळी म्हणाला. तो म्हणतो मला चित्र रेखाटायला कॅनव्हास लागत नाही. चीत्रकारासाठी कोणतीही गोष्ट कॅनव्हास होऊ शकते. माझ्यातली कला माझ्या अनेक अडचणीतून घडत गेली. त्याचप्रमाणे

अक्षयच्या अलीकडच्या चित्रांचा भर हा सध्या शाळा बंद असल्याने शाळेपासून दीर्घकाळ दूर असलेल्या बच्चेकंपनीच्या मनात नेमक्या काय भावना आहेत त्या रेखाटण्याचा प्रयत्न करण्यावर राहिला आहे. त्याच्या चित्रातील कल्पकता, भव्यदिव्यता त्याच्या विचारातही आहे. म्हणूनच त्याची पावल संविता आश्रम पणदूर कडे वळली. आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांनीही त्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्याला शुभेचा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here