26 C
Panjim
Tuesday, August 16, 2022

मोंड खाडीकिनारी पोत्यात हात पाय तोडलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत बिबट्या सापडला

spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – देवगड तालुक्यातील मोंड खाडीकिनारी सापडलेल्या पोत्यामध्ये हात, पाय, धड तोडलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत बिबट्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार मोंड पोलिस पाटील जितेंद्र राणे याना मोंड चचवड येथे खाडीकिनारी पाण्यात सिंमेट पोते दिसून आले. त्यातून काहीतरी कुजलेला वास येत असल्याचे त्यांनी देवगड पोलिस स्टेशनला कळविले. यानंतर देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी जावून पाहणी केल्यानंतर सिमेंटच्या पोत्यात बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. मृत बिबट्याचे हात, पाय व शीर तोडलेले होते. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रीतसर पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला. मोंड खाडीकिनारी सिंमेटच्या पोत्यात बिबट्याचे हात पाय शीर तोडून कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img