25.6 C
Panjim
Sunday, October 2, 2022

मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीला एक रुपयाही नाही सरकार सिंधुदुर्ग-रत्नागिरी वर सूड उगवत असल्याचा आमदार नितेश राणे यांचा आरोप

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – राज्य शासनाने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत करोडोची गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर केले. यात कोकणात 77 टक्के गुंतवणूक होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र कोकणात होणाऱ्या या 77% गुंतवणुकीत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात एकही रुपयाची गुंतवणूक नाही. जील्ह्यात येणार्‍या प्रकल्पांना विरोध, गुंतवणुकीत जिल्ह्यासाठी एक रुपयाही नाही असे असेल तेथील तरुण-तरुणींनी काय करावे? सरकार सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेवर सुड उगवत आहे असा आरोप करतानाच चिपी विमानतळाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या या जिल्ह्यातील स्थानिक लोकांनाच मिळाल्या पाहिजेत. बाहेरच्यांना येथे नोकऱ्या करू देणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला. कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी जनतेची दिशाभूल करतात

कोकणातील ठाणे, पालघर रायगड या जिल्ह्यात गुंतवणूक आहे. गेल्या एक वर्षांपासून कोरोना काळ असताना सत्ताधारी जुन्या प्रकल्पात काहीही करत नाही. प्रकल्प पर्यटन काहीच कार्य नाही.सी वर्ल्ड प्रकल्प, एमआयडीसीत काहीच गुंतवणूक केली नाही.आमचा सिंधुदुर्ग दरडोई उत्पन्न ५ नंबरवर राज्यात होता, त्याचे काय होणार? ही आमची चिंता आम्हाला आहे. सिंधुदुर्गातील सत्ताधारी जनतेची दिशाभूल करून विकासापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

बेरोजगार तरुणांना नोकऱ्या कुठून देणार

उद्योग विभागाच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक सिंधुदुर्गात येत नसेल तर येथील तरुणांनी करयचे काय?आडाळी एमआयडीसी किती गुंतवणूक होणार?तरुणांनी करायचे काय? सिंधुदुर्ग रत्नागिरी का वगळली?
बेरोजगार तरुणांच्या कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो बेरोजगार जिल्ह्यात आलेले आहेत, त्यांना नोकऱ्या कुठून देणार?त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न मांडण्याची गरज होती मात्र ही उद्योग क्षेत्रात होणारी गुंतवणूक होत असताना पालकमंत्री खासदार कुठे गेले होते?असा सवालही नितेश राणे यांनी व्यक्त केला.

नानारला शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा आणि खासदारांचा विरोध

नाना प्रकल्पाबद्दल शिवसेनेचे आमदार वेगळी भूमिका घेत आहेत .स्थानिकांना प्रकल्प हवा असल्याने त्यांची भूमिका बदलली आहे मात्र शिवसेनेचे खासदार त्या प्रकल्पाला विरोध करून बेरोजगारांच्या पोटावर आणण्याचा प्रकार करत आहेत. ठाकरे सरकार या जिल्ह्याच्या प्रत्येक विषयांत अन्याय करत आहे. ही अधोगती होत आहे,वॉटर स्पोर्ट बाबत अद्याप ऑर्डर नाही. किंवा पर्यटक येणार आणि स्थानिकांना रोजगार मिळणार ,कोकणावर अन्याय आहे,तो जनतेसमोर आम्ही माडत आहोत.

चिपी विमानतळ नोकऱ्यांबाबत माहिती दिली जात नाही

चिपी विमानतळ मध्ये चालू होत असताना नोकऱ्यांच्या माहिती दिली जात नाही. विमानतळावर काम करणारा एकही बाहेरचा माणूस असणार नाही.ट्रेंनिग द्यायचे आहेत,त्यांना आम्ही मदत करतो. अन्यथा चुकीच्या पद्धतीने नोकरभरती झाल्यास आम्ही गप्प बसणार असल्याचा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img