26 C
Panjim
Thursday, August 11, 2022

मी दबावाला न जुमानणारा जास्तीत जास्त काय तर मंत्रीपद जाईल बच्चू कडूंचा डोस

spot_img
spot_img

 

माझ्यावर दबाव आणून मी कोणाचे ऐकणारा नाही. जास्तीत जास्त काय होईल मंत्रीपद जाईल पण, लोकांना न्याय देताना मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास मी ते खपवून घेणार नाही, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिला.
मंत्री बच्चू कडू सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास विभागाचा आढावा घेतला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले, अनेक शासकिय योजना आजही लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. ५० वर्षापूर्वी महिला व बालसंगोपन योजना अस्तित्वात आली. मात्र, १० ते २० हजार विधवा महिला असताना लाभार्थ्यांची संख्या मात्र, तीनशे, चारशे असणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आम्ही सातारा जिल्ह्यात नवीन योजना लागू केली आहे.
दरम्यान यावेळी सातारा येथील के.एस.डी. शानभाग व जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे दोन्ही शाळांनी चाचणी परीक्षेस बसू दिले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान झाले होते. या संदर्भात आज आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री बच्चु कडू यांना निवेदन दिले. त्या अनुषंगाने त्यांनी या दोन्ही शाळांवर तत्काळ कारवाई करुन त्याचा अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत.

याबाबत माहिती अशी की, आज दि. ११ जानेवारी रोजी राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री बच्चू कडू आढावा बैठकीच्या निमित्ताने सातार्‍यात आले होते. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सरदार उर्फ सागर भोगांवकर यांनी या दोन्ही शाळांसंदर्भात निवेदन दिले.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img