मासेमारी करताना निवती समुद्रात कोसळल्याने खलाशाचा मृत्यू सुसाट वाऱ्यामुळे तोल गेल्याचा अंदाज

0
55

 

सिंधुदुर्ग – वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्रात मासेमारी करताना थेट बोटीवरुन समुद्रात कोसळल्याने एका खलाशाचा मृत्यू झाला. ही घटना काल २६ जानेवारीला घडली. सुरज तुकाराम कुर्ले (वय ३१, रा. मुळ कारवार, सध्या रा. मेढा-मालवण) असे त्याचे नाव आहे. याबाबतची अधिक माहीती अशी की, सुरज कुर्ले हा नेहमीप्रमाणे काल २६ जानेवारीला मासेमारी करण्यासाठी बोटीवर चढला. निवती बंदर समोर खोल समुद्रात आपले सहकाऱ्यांसोबत मासेमारी जाळी समुद्रात टाकत असताना वान्यामुळे त्याचा तोल जाऊन तो समुद्रात पडला. काही क्षणात त्याच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांनी पाण्यात उतरून त्याला वर बोटीवर काढले. मात्र तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यास उपचाराकरिता तात्काळ किनाऱ्यावर बोट आणून उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. याबाबत माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक जी. व्ही. वारंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो. हवालदर श्री. भांगरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here