‘भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत आहे,’ अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची स्वबळावर सत्ता येईल असा अंदाज एग्झीट पोलने व्यक्त केला होता. मात्र दोन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळवण्यात भाजपाला अपयश आले आहे. “नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहून मला भारतीय मतदारांचे अभिनंदन करायचे आहे. हरियाणा असो किंवा महाराष्ट्रातील निवडणूक किंवा पोटनिवडणुक भाजपा पूर्णपणे हरला आहे. आता ते चौटाला आणि इतर अपक्षांसमोर सत्ता स्थापनेसाठी भीक मागत आहेत. त्यांना अद्याप महाराष्ट्रात सत्ताही स्थापन करता आली नाही,” असा टोला आझाद यांनी लगावला आहे. दिल्लीमधील एका जाहीर सभेमध्ये भाषणादरम्यान त्यांनी ही टीका केली. देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपा दोन तृतीयांश जागांवर पराभूत झाल्याचा टोलाही आझाद यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपा अपक्ष आमदारांसमोर भीक मागत आहे – गुलाम नबी आझाद
