30 C
Panjim
Saturday, March 25, 2023

महाराष्ट्रातील जेष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – महाराष्ट्रातील जेष्ठ गझलकार, पत्रकार, सिंधुदुर्गचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.

महाराष्ट्रातील अनेक गझल मुशायऱ्यांमध्ये नानिवडेकर सहभागी असत. ९ व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. ‘चांदणे नदीपात्रात’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रचंड गजला होता.

काही काळ त्यांनी दै. पुढारी सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये उपसंपादकपदी काम पाहिले होते. महाराष्ट्र टाईम्स चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी म्हणून सध्या ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते.

आपल्या मिश्किल आणि विनोदबुद्धीने त्यांचे सर्व क्षेत्रांत सर्वांशी आपुलकीचे संबंध होते. गझलकार सुरेश भट यांच्या गझलेचा वारसदार म्हणून नानिवडेकर यांना ओळखले जाई. विशेष म्हणजे नानिवडेकर हे सुरेश भटांचे मानसपुत्र म्हणूनच ओळखले जात होते.

गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नानिवडेकर यांच्या अनेक गझला आपल्या जाहीर कार्यक्रमात सादर केल्या होत्या. त्यांच्या ‘निघावयास नानिवडेकर हरकत नाही’ या गझलेवर तर कैकजण फिदा होत असत.

जणू आयुष्याच्या रेषेचे घड्याळ नियतीने पाहिले आणि मधुसूदन नानिवडेकर यांनी निघावयास हरकत नाही, असे म्हणत आपल्या गझलेतील शब्दांप्रमाणेच इहलोकातून एक्झिट घेतल्याची भावना साहित्यप्रेमींतून व्यक्त होत आहे.

गझलकार नानिवडेकर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातील नानिवडे हे त्यांचे गाव.

गावचे काही वर्ष त्यांनी सरपंच म्हणूनही काम पहिले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्ष होते.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles