सिंधुदुर्ग – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली.कोरोनाचा फैलाव वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक राजकीय पदाधिकारी याआधी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी खासदार नीलेश राणे, युवा नेते संदेश पारकर, पालकमंत्री उदय सामंत आदींचा समावेश आहे. यातील बहुसंख्य नेत्यांनी कोरोनावर मातही केली आहे.
आज भाजपचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी याबाबत ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली.यात म्हटले आहे की, माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रूजू होईन.