मडुरा पुलाच्या मंजुरीसाठी उपोषण दशक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती

0
9

सिंधुदुर्ग – मडुरा-सातोसे-कवठणी-किनळे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर पूल व सातार्डा येथील मोरीपूलाच्या मंजुरीसाठी मडुरा पुलावर बेमुदत उपोषण सुरू झाले आहे.

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दशक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित आहेत. मडूरा पूलावरच सदर उपोषण सुरु आहे.

यावेळी श्री देवी माऊली दशक्रोशी रस्ता समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडीत, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोस्कर

माजी सरपंच आनंद परब, सातोसे सरपंच बबन सतोस्कर, पाडलोस सोसायटी चेअरमन सुभाष करमळकर, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे आदी उपोषणाला बसले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here