25 C
Panjim
Monday, March 20, 2023

बापरे… महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांना मिळते इतके वेतन सिंधुदुर्गातील माहिती अधिकार कार्यकर्त्याने मिळवलेल्या माहितीतून आकडा आला समोर

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – महागाईमुळे सामान्य जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडले असताना जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या खर्च आणि भत्त्यांची चर्चा कायमच होत असते. दिल्ली सरकारने विधानसभेतील आमदारांच्या वेतनात 66 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर महाराष्ट्रातील आमदारांना किती वेतन मिळते हा विषय चर्चेला येणे स्वाभाविक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या माहितीत आमदार महोदयांच्या वेतनाचा आकडा अन्य राज्यांच्या तुलनेत घसघशीत असल्याचे समोर आले आहे.

राज्यात सध्या कांद्याचे भाव गडगडले आहेत. जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचारी संपावर जाण्याचे प्रमाण वाढत आहे. उष्णतेच्या लाटेत कोकणातील आंबा पिक अडचणीत आले आहे. त्यातच वाढती महागाई सामान्यांचे कंबरडे मोडत असल्याने आर्थिक नियोजन ढासळत चालले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने विधानसभेच्या आमदारांना घसघशीत पगार वाढ दिल्याची बातमी समोर आली. त्यानंतर महाराष्ट्रातील आमदारांचे वेतन किती याची चर्चा रंगू लागली.

दरम्यान या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांना मिळणारे वेतन किती ? या प्रश्नाचे उत्तर एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळविले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याला तब्बल दोन लाख 71 हजार 947 रुपये एवढे निव्वळ एकूण वेतन आयकर वजा करून देण्यात येत असल्याची माहिती आता माहिती अधिकारातून समोर आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत नेवगी यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाकडून त्यांना माहिती देण्यात आली आहे. या माहितीत विधानसभेच्या विद्यमान सदस्यांना देण्यात येणाऱ्या एकूण वेतनामध्ये मूळ वेतन एक लाख 82 हजार 200 रुपये, महागाई भत्ता 34 टक्के असून तो 69 हजार 948 रुपये, दूरध्वनी सुविधा भत्ता 8000 रुपये, स्टेशनरी आणि टपाल सुविधा भत्ता 10,000 रुपये, संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता 10,000 रुपये अशी एकूण 2 लाख 72 हजार 148 रक्कम त्यात अन्य दोन किरकोळ भत्ते मिळून विधानसभा सदस्याला निव्वळ एकूण वेतन दोन लाख 72 हजार 947 रुपये मिळत असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे मोबाईलच्या जमान्यात आमदारांना दूरध्वनीसाठी आठ हजार रुपये मिळतात. एकंदरीत आपण निवडून दिलेल्या आमदारांचे वेतन किती आहे हे यातून समोर आले आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles