25.7 C
Panjim
Sunday, November 27, 2022

पार्सल ट्रेनने औषधं रत्नागिरीत आली, आंबाही जाणार ट्रेनने

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सध्या देशभर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे या अडचणीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. 20 एप्रिलला ओखा वरून सुटलेली ही ट्रेन आज रत्नागिरीत दाखल झाली होती. सकाळी 11 वाजता हे स्पेशल ट्रेन रत्नागिरीत आली. या ट्रेनने रत्नागिरीत औषधं आणण्यात आली. त्यानंतर ही ट्रेन पुढे रवाना झाली.

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये, म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी ही पार्सल ट्रेन ओखावरून निघाली. ही ट्रेन आज मंगळवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहोचली. या ट्रेनमधून गुजरातमधून औषधांचा साठा रत्नागिरीतल्या मेडिकलसाठी आणला गेला. रत्नागिरीत हा माल या पार्सल ट्रेनमधून उतरविण्यात आला.रत्नागिरीला हा माल उतरवून ही ट्रेन कणकवलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर ही ट्रेन मडगाव आणि उड्डपी या स्थानकांवर थांबवणार आहे. तसेच पुढे तिरूअनंतपुरमपर्यत धावणार आहे. येथे पोहचल्यानंतर ही ट्रेन पुन्हा २४ एप्रिलला तिरुअनंतपुरम येथून निघून १ वाजून २० मिनिटांनी उड्डपी, ६ वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे.
दरम्यान परतीच्या वेळी रत्नागिरीतून किमान २ हजार पेट्या आंबा या स्पेशल पार्सल ट्रेनमधून जाईल, असा अंदाज कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img