पवारांनी मनात आणलं तर बाळासाहेबांचं स्मारक होतंय ती जागा एनसीपी कार्यालय करतील शरद पवारसाहेब जर अमित शहासाहेबांना भेटले तर नवल काय ; निलेश राणेंचा ट्विट करत सवाल

0
105

 

सिंधुदुर्ग – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरात मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याच्या वृत्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र ते शरद पवार आहेत, ते अमित शहा साहेबांना भेटले तर नवल काय ? त्यांनी मनात आणलं तर आज बाळासाहेबांचं स्मारक होतंय ती जागा एनसीपी कार्यालय करतील, असे ट्विट भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणेंनी केले आहे.

पवार-शहांच्या भेटीचे वृत्त एका हिंदी दैनिकाने दिले आहे

शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुजरात मध्ये भेट घेतल्याचे वृत्त एका गुजराती दैनिकाने दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीच्या वृत्तानंतर राज्यात सत्ताबदल होणार का ? अशी चर्चा सुरू झाली असून भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विट मध्ये काय म्हणाले निलेश राणे

“शरद पवार साहेब जर अमित शहा साहेबांना भेटले तर त्यात नवल वाटायचं कारण नाही. कारण शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील, याचा नेम नसतो. शरद पवार ते आहेत जे शिवाजी पार्कला स्व. बाळासाहेबांचे स्मारक होत आहे ती जागा एनसीपी कार्यालय करतील आणि एनसीपी कार्यालय बाळासाहेबांचे स्मारक करतील.” असं निलेश राणेंनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here