26 C
Panjim
Thursday, October 6, 2022

परशुरामच्या भूमीत उन्मत्त झालेले गाडले गेलेत – परशुराम उपरकर

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – कोकण भूमीत जे उन्मत्त होतात त्यांना या कोकणच्या परशुराम भूमीत गाडले जाते. राणेसमर्थक काँग्रेसनी शिवसैनिकांना केलेली मारझोड, बाहेरून आणलेल्या गुंडांकडून जी दहशत पसरवली होती. त्यावेळी जुने प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यानी पक्ष बदलला तर काहींनी राजकारण सोडले. आज राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे टिकाटिपनी करत आहेत. ही टीका करणारे रमेश गोवेकरच्या गायब होण्याचे गूढ सांगतील काय ? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.

 

आत्मक्लेश करणाऱ्या संदेश पारकर यांनी त्यावेळी नितेश राणेंच्या विजयासाठी स्वतः किती प्रयत्न केले, याचेही चिंतन करावे. राजेश कदम हत्याप्रकारणात टीका करणारे प्रमोद जठार आज नारायण राणे, नितेश राणेंचे गोडवे गात उदोउदो करताहेत. कोकणातील जनतेला फसवण्याचा प्रयत्न करणारे सोयीनुसार पक्षबदल करून टीका करतात. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी जिल्हा बँक अध्यक्ष तर कोणी महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळवणारे त्यावेळी राणेंचे गोडवा गात होते. त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेने एकमेकांवर टीका करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना धडा शिकवला पाहिजे, असे उपरकर म्हणाले. म्हणूनच कोकण ही परशुरामाची भूमी असून या परशुरामाच्या भूमीत जे करायचे ते इथेच फेडायचे, असे उपरकर म्हणाले.

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img