पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी नवरदेव करतात वडाची पूजा ; १२ वर्षापासून सुरु आहे उपक्रम

0
102

सिंधुदुर्ग – नवऱ्याच्या समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी पत्नी व्रत वैकल्पक करते मग नवऱ्याने पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत वैकल्प का करू नये? असा प्रश्न उपस्थित करून वटपौर्णिमे दिवशी कुडाळ येथील नवरदेव आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला सात फेऱ्या मारतात यामधून स्त्री-पुरुष समानतेचा संदेशही या उपक्रमांमधून गेली १२ वर्ष याठिकाणी दिला जात आहे.

वटपौर्णिमा म्हटली की पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी व्रत वैकल्प करते वडाच्या झाडाची पूजा करून वडाच्या झाडाप्रमाणे आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढावे यासाठी वडाला फेर्‍या घालतात ही परंपरा गेली कित्येक वर्षे सुरू आहे पण आता स्त्री आणि पुरुष समानतेच्या धर्तीवर पुरुषां बरोबर स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत घर सांभाळून त्या आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजूही सांभाळत आहेत अशा परिस्थितीत आपल्या पतीसाठी व्रत वैकल्प ठेवणाऱ्या पत्नीसाठी पतीने सुद्धा व्रत वैकल्प केल्यास स्त्री-पुरुष समानतेचा संदेश समाजात पसरू शकतो यासाठी गेली १२ वर्ष कुडाळ येथील गवळदेव मंदिराजवळ वटपौर्णिमा दिवशी पुरुष वडाची पूजा करून या वडा भोवती आपल्या पत्नीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतात. ही संकल्पना बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व डॉ. संजय निगुडकर यांनी १२ वर्षापूर्वी मांडली आणि शहरातील बुद्धिजीवी नागरिकांनी या संकल्पनेला उचलून धरले गेली १२ वर्षे या ठिकाणी हा उपक्रम राबविला जात आहे यावेळी प्रा. अरुण मर्गज यांनी सांगितले की पुरुषांसाठी स्त्री नेहमीच योगदान देत असते पण त्या स्त्रीसाठी पुरुषांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हणून स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी सांगण्यापेक्षा अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन खरी स्त्री पुरुष समानता जोपासावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here