29 C
Panjim
Wednesday, May 18, 2022

नितेश राणे यांना घेऊन पोलीस कणकवली पोलीस ठाण्यात दाखल

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – भाजप आमदार नितेश राणे यांना घेऊन पोलीस आज पुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. आमदार नितेश राणे यांना घेऊन काल पोलीस गोवा येथे त्यांच्या हॉटेल मध्ये गेले होते. आज त्यांना कणकवलीत आल्यानंतर पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. त्यांच्या पोलीस कोठडीची आज मुदत संपत असल्याने त्यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी बुधवारी कणकवली दिवाणी न्यायालयात हजर होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बुधावरी दुपारी आमदार नितेश राणे हे संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात कणकवली न्यायालयात शरण गेले. यावेळी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कणकवली पोलिसांनी त्यांचा तात्काळ ताबा घेतला. काल त्यांना घेऊन कणकवली पोलीस गोवा येथे गेले होते.

दरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिस चौकशी करत आहेत. त्यांना आज सावंतवाडीहून कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. कणकवलीचे पोलीस निरीक्षक तथा या प्रकरणाचे तपासी अंमलदार सचिन हुंदळेकर हे आमदार नितेश राणे यांची चौकशी करत आहेत. संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या पुणे येथील सचिन सातपुते नामक व्यक्तीसोबत आमदार नितेश राणे यांचे संभाषण झाले असून नितेश राणे यांच्या माध्यमातूनच परब यांच्यावरील खुणी हल्ल्याचा कट रचला गेला असा पोलिसांचा दावा आहे. यासंदर्भात नितेश राणे यांची पोलिस चौकशी करणार आहेत अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान आज आमदार नितेश राणे यांच्यासोबत त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. या दोघांनाही दुपारनंतर कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. न्यायालय त्यांच्या कोठडीची मुदत आणखी वाढवते ती त्यांना न्यायालयीन कस्टडी सुनावते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img