30.2 C
Panjim
Wednesday, January 19, 2022

नाणार ग्रीन रिफायनरी आल्यास कोकणातील आंब्याच्या बागांवर परिणाम होणार का हे पाहणं महत्वाचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे मत

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पासंबंधित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका फार महत्वाची आहे. मुख्यमंत्र्यांनी या अगोदर सांगितलय माझा विकासाला विरोध नाही. परंतु स्थानिक जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे. स्थानिकांचा विरोध नसेल तर चांगले उद्योग आले पाहिजेत अश्या मताचे मुख्यमंत्री आहेत. नाणार ग्रीन रिफायनरी आल्यास कोकणातील आंब्याच्या बागांवर परिणाम होणार का हे पाहणं महत्वाचे आहे. ग्रीन रिफायनरी मुळे परिणाम होणार की नाही याबाबत आवश्यक ते संशोधन होऊन ते मुख्यमंत्र्यां पर्यत पोहोचलं पाहिजे. असे मत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाच्या समर्थनार्थ दिलेल्या पत्रानंतर ते बोलत होते.

स्थानिकांच्या मतासोबत शिवसेना नेहमीच राहते

मुख्यमंत्री यातून मार्ग काढू शकतात. स्थानिकांचं जे मत असत त्या मतासोबत शिवसेना नेहमीच राहते. हा प्रकल्प जर झाला पाहिजे असं वाटत असल्यास या प्रकल्पाचा पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही, बागायतीवर कोणता परिणाम या प्रकल्पामुळे होणार नाही हे सिद्ध व्हायला लागेल. जर कुणाला वाटतं असेल हा प्रकल्प झाला पाहिजे तर त्यांनी स्थानिकांना समजवल पाहिजे. ग्रीन रिफायनरी हा पेट्रोलियमचा प्रकल्प असल्यामुळे स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील रोजगाराचा प्रश्न हा प्रकल्प आल्यास निश्चित सुटू शकतो. असेही केसरकर म्हणाले.

काय आहे राज ठाकरे यांच्या पत्रात

कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल, ना महाराष्ट्राला. राज्याचं दीर्घकालीन हीत लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करणारे पत्र महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -