25.8 C
Panjim
Friday, September 30, 2022

नाटळ नरडवे गावासाठी पर्यायी रस्त्याचे काम युद्ध पातळीवरसुरू

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – अतिवृष्टीमुळे नाटळ मल्हारी पुल कोसळल्या नंतर नाटळ नरडवे आणि दिगवळे तसेच दरिस्ते गावांना जोडण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा भिसे, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांच्या सहकार्यातून सांगवे पामतेल ते दारिस्ते, शिवडाव असा जोडणाऱ्या केटीवेअवेर बंधाऱ्या लगतच्या पुरात वाहून गेलेल्या रस्त्यावर आज युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
कणकवली तालुक्यातील कनेडी ते नाटळ, दिगवळे, नरडवे, दारिस्ते या गावातील रस्त्याच्या संपर्क तुटला आहे. नाटळ येथील मल्हारी नदीवरील पुल कोसळल्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतुक कणकवली, हलवल, शिरवल, शिवडाव, दारिस्ते अशी वळवीण्यात आली आहे. मात्र, हा १८ ते २० किमीचा फेरा आहे. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा भिसे यांनी श्रमदानातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या केटीवेअर बंधाऱ्याचा रस्ता सुरळीत करण्यात येत आहे. यासाठी बाळा भिसे यांच्याकडून जेसीबीची व श्री. सावंत यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे. कनेडी रस्त्यावरील सांगवे पामतेल भागातील हा पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाल्यामुळे शिवडाव,नाटळ, दारिस्ते, नरडवे, दिगवले,कळसुली, शिरवल या गावांना फायदा होणार आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीला सुरूवात झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले आहे. आज शिवसेनेच्या कार्यकत्यानी श्रमदानातुन हा मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी गणेश शिवडावकर, नितीन हरमळकर, पं.स. सदस्य मंगेश सावंत, नाना राऊळ, संदीप शिवडावकर, सुरेश राऊळ, संजय सावंत, मिलिंद बोभाटे, शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img