सिंधुदुर्ग – देवगड तालुक्यातील फणसगाव वरुन म्हाळुंगेकडे जाणा-या मार्गावर मोठया प्रमाणीत चिरे भरुन जाणारी अवजड वाहने जात असल्याने रस्त्याची दुरावस्था होत असल्याचा अरोप करीत येथिल नागरीकांनी आक्रमक होत या मार्गावरील वाहतूक बंद करीत रास्तारोको केला. दरम्यान हा मार्ग गेली अनेक वर्षे नादुरुस्त आहे त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने नाईलाजास्तव रस्ता रोको केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र यानंतर तातडीने खान मालकांचे प्रतिनिधी दिनेश नारकर यांनी आंदोलन ठिकाणी येऊन रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करतो असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दरम्यान या मार्गावर रास्तारोकोमुळे चिरे वाहतूक करणा-या ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी या रास्तोराको आंदोलनात म्हाळुंगे सरपंच संदीप देवळेकर, उपसरपंच सौ साक्षी तावडे दीपक परब,संदीप राणे,प्रकाश राणे, सामाजिक कार्यकर्ते महेश नारकर, उदय पाटील,रामकृष्ण राणे, ग्रामपंचायत सदस्यसह नागरीक व महिला वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होत्या. देवगड तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्था झालेली असताना गेली अनेक वर्षे स्थानिक लोकप्रतिनीधी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने फगसगाव ते म्हाळुंगे रस्ताची दुरावस्था झालेली आहे. सध्या या मार्गावर आजरी माणूस असो वा नागरीक यांना जाताना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्या खराब असल्याने अपघात होत आहेत, प्रशासनाला व लोकप्रतिनीधींना वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष होत आहे असाही आरोप नागरीकांकडून होत आहे.
त्यात गोवळ भागात असलेल्या चिरे खाणी येथून होणारी चिरे वाहतूक करणारी बारा व चौदा चाकी ट्रक अवजड वाहतूक करत असल्याने अजून रस्त्याची अक्षरक्षः चाळण झालेली आहे. त्याचमुळे प्रशानस लक्ष देत नसल्याने येथिल चिरे खान मालकांनी रस्ता वापरता म्हणून दुरुस्त करून द्या याकरिता रास्ता रोको करण्यात आला. यानतंर चिरे खाम मालकांच्या प्रतिनिधींनी रस्ता दुरुस्ती करण्याची हमी दिली असली तरी स्थानिक लोकप्रतिनीधी व प्रशासाने या मार्गावर लक्ष घालून तातडीने खडीकरण व डांबरीकरण करून चांगला रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी म्हाळुंगे ग्रामस्थ करीत आहेत.