सिंधुदुर्ग – दुचाकीला धडक देऊन पळून जाणाऱ्या पर्यटकांच्या कारला स्थानिकांनी पाठलाग करून गाठले आणि चालकाला चांगलाच चोप दिला. ही घटना सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे घडली.
या अपघातात दुचाकीचालक सनी फर्नांडिस (२८), हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित चारचाकी पुणे येथील पर्यटकाची आहे.
ते आंबोलीतून सावंतवाडीच्या दिशेने येत होते. मात्र कारिवडे येथे आले असता त्यांच्या चारचाकी गाडीची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीस्वाराचा डोक्याला गंभीर दुखापत झाली तर संबंधित कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला मात्र ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून भर रस्त्यात त्याला चोप दिला व जखमीला रुग्णालयात दाखल केले.