27 C
Panjim
Saturday, May 21, 2022

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर कुडाळ-हुमरस येथे कोटयावधी रुपयांची दारू जप्त

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग जिल्हा शाखेच्या पथकाने करोडो रुपयाची दारू पकडली आहे. ही कारवाई आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कुडाळ-हुमरस येथे मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात आली. मात्र संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला.

दरम्यान ताब्यात घेण्यात आलेला कंटेनर पूर्ण दारूच्या बाॅक्सने भरलेला असल्यामुळे नेमका मुद्देमाल किती याचा आकडा मिळेपर्यंत संध्याकाळ होणार आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून मुंबईच्या दिशेने करोडो रुपयाची दारू वाहतूक होत असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे पोलिस उपअधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अधिवेशनचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सापळा रचला व सकाळी साडे आठ ते साडे आठच्या सुमारास ही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

या गाडीत कोट्यावधी रुपयाची दारू असल्याचे प्राथम दर्शनी पोलिसांचे म्हणणे आहे.मात्र नेमका मुद्देमाल किती याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. याबाबत श्री. धनावडे यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार आम्ही सापळा रचला होता.

मात्र चालक गाडी तेथेच टाकून पळून जाण्यास यशस्वी झाला आहे, असे ते म्हणाले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शेळके, रामचंद्र शेळके, सहकारी अनुप खंडे,कृष्णा केसरकर, श्री.सरमळकर, श्री.गावडे यांनी केली.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img