28 C
Panjim
Wednesday, August 17, 2022

जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत भिडले भर सभेत खडाजंगी

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत तिलारी धरण कालवा फुटीच्या मुद्यावर एकमेकाला भिडल्याची घटना घडली आहे. दोडामार्गातील तिलारी धरण डावा कालवा फुटल्याच्या विषया वरून भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी मांडलेल्या भुमिकेला शिवसेनेचे सदस्य बाबूराव धुरी यांनी आक्षेप घेतल्यामुळे वाद निर्माण झाला. याच मुद्यावर राणे आणि राऊत यांच्यातही शाब्दिक चकमक घडली.

दोन्ही बाजूच्या सदस्यांचा सभागृहात गोंधळ

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचा दावा कालवा अलीकडेच फुटला या बाबतचा प्रश्न भाजपा सदस्य राजन म्हापसेकर यांनी उपस्थित केला. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्तर देण्यापूर्वी शिवसेना सदस्य बाबुराव धुरी बोलायला लागले. यावरून गदारोळ सुरु असताना आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याला खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला. आम्ही नारायण राणे यांचा आदर करतो मात्र आमदार नितेश राणे यांचे वक्तव्य योग्य नाही. असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त करताच शब्दुक चकमक उडाली. यावेळी राऊत आणि राणे एकमेकाला चांगलेच भिडले. पालकमंत्री सामंत यांनी हस्तक्षेप करत या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक बोलावली जाईल असे सांगत सर्वाना शांत केले.

नियोजन सभेत सुचविलेली कामे बदली जातात

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभा एक वर्षाने होत आहे,जी कामे मागच्या बैठकीत सुचवली. त्याला मंजुरी मिळाली. पण ती कामे बदलण्यात कशी आली ? हे अधिकार पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना आहे का ? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी व भाजपच्या सदस्यांनी करत पालकमंत्र्यांना धारेवर धरले. नियोजन सभेत सुचविलेली कामे बदली जातात असा थेट आरोप यावेळी भाजपा सदस्यांनी केला.

अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना

कासार्डे,फोंडाघाट परिसरात बेकायदेशीर वाळू व्यवसाय चालतो तो तातडीने बंद करा.अधिकाऱ्यांच्या पाठींब्यामुळे हा सिलिका वाळू व्यवसाय सुरू असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सभागृच्या लक्षात आणून दिले.दरम्यान जिल्हाधिकारी यांनी सर्वच अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.दरम्यान वाळूचा दर जो दुप्पट झाला आहे तो कमी करू असे पालकमंत्री यांनी सांगितले.तर खासदार राणे यांनी अवैध व्यवसायला पाठींबा देणाऱ्या पुढाऱ्यांवरही कारवाई करा.असे सूचित केले

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img