ग्रीन रिफायनरीसाठी दिल्लीत लवकरच बैठक भाजपा आमदार नितेश राणे यांची माहिती

0
137

 

सिंधुदुर्ग – विरोध करणारी गावे वगळून रिफायनरी प्रकल्प होणार असून याबाबत दिल्लीमध्ये केंद्रीय पेटड्ढोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. नानार ग्रीन रिफायनरी ठरली आहे तेथेचे होणार असल्याचे सांगून विरोध असणारी गावे वगळून हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा भरपूर पाठींबा आहे. केवळ खासदार विनायक राऊत हे एकमेव विरोधक राहीले आहेत, असेही ते म्हणाले.

 

विनायक राऊत यांच्या विजयात भाजपाचा मोठा वाटा आहे मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाची खासदार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सधुदूर्ग जिल्हा दौऱ्यावर आले यावेळी त्यांनी पर्यटनाबाबत पर्यटन व्यावसायिक व व्यापारीवर्ग यांच्याशी संवाद साधणे गरजेचे होते. मात्र आम्ही मंजुर केलेली विकासकामे त्यांनी मंजुर केल्याचे जाहीर केले. या विकासकामांना चालना देण्याचे काम केले तर स्वागत करू. त्यांनी पुन्हा जिल्ह्यात येवून बैठक घ्यावी व आंबा तसेच इतर फळांचे अवकाळी पावसाने व वातावरण बदलामुळे झालेल्या नुकसानीची माहिती सहकाऱ्यांकडून घ्यावी. त्यांना परत मामाच्या गावाला यायचे असेल तर आम्हीही राजकारणाची टोपी बाजुला ठेवून विकासकामे करण्यासाठी पुढाकार घेवू असे आमदार राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here