26 C
Panjim
Friday, January 27, 2023

गोव्यात आयोजित  52 व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेल्या 15 चित्रपटांची यादी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गोदावरी, मी वसंतराव आणि सेमखोर या  भारतीय चित्रपटांचा समावेश 

- Advertisement -spot_img

 

52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी), या महोत्सवादरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी, आंतरराष्ट्रीय चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. या विभागातील स्पर्धेसाठी  वैशिष्ट्यपूर्ण कथेवर आधारित जगभरातील सर्वोत्कृष्ट  चित्रपट निवडले जातात. वर्षभरातील  काही सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवणारा हा या चित्रपट महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा विभाग आहे आणि हे  15 चित्रपट सुवर्ण मयूर आणि इतर पुरस्कारांसाठीच्या स्पर्धेत आहेत.

 

स्पर्धेसाठी निवड झालेल्या  चित्रपटांची यादी

1. एनी डे नाऊ | दिग्दर्शक : हमी रमजान | फिनलंड

2. शार्लोट | दिग्दर्शक : सायमन फ्रँको | पॅराग्वे

3. गोदावरी | दिग्दर्शक: निखिल महाजन | मराठी, भारत

4. एंट्रेगलडे | दिग्दर्शक : राडू मुंटियन |रोमानिया

5 लँड ऑफ ड्रीम्स | दिग्दर्शक: शिरीन नेशात आणि शोजा अझरी | न्यू मेक्सिको, अमेरिका

6. लीडर | दिग्दर्शक : कटिया प्रिविजेन्सव | पोलंड

7. मी वसंतराव | दिग्दर्शक: निपुण अविनाश धर्माधिकारी | मराठी, भारत

8. मॉस्को डझ नॉट हॅप्पन  | दिग्दर्शक :दिमित्री फेडोरोव | रशिया

9. नो ग्राउंड बीनीथ द फीट  | दिग्दर्शक : मोहम्मद रब्बी म्रिधा  | बांगलादेश

10. वन्स वी वेअर गुड फॉर यू  | दिग्दर्शक: ब्रँको श्मिट | क्रोएशिया, बोस्निया आणि हर्जेगोविना

11. रिंग वंडेरिंग  | दिग्दर्शक : मसाकाझू कानेको | जपान

12. सेव्हिंग वन व्हू वॉज डेड | दिग्दर्शक : वाक्लाव कद्रन्का | झेक प्रजासत्ताक

13. सेमखोर | दिग्दर्शक : एमी बरुआ | दिमासा, भारत

14. द डॉर्म | दिग्दर्शक: रोमन वास्यानोव | रशिया

15. द फर्स्ट फॉलन  | दिग्दर्शक : रॉड्रिगो डी ऑलिव्हेरा |ब्राझील

 

हे चित्रपट विविध श्रेणीतील पुरस्कारांच्या  स्पर्धेत असतील  उदा:

1. सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्ण मयूर )-  या पुरस्काराचे स्वरुप आहे रोख पारितोषिक रु. 40,00,000/- दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान वितरण केले जाईल. दिग्दर्शकांना रोख रकमेव्यतिरिक्त सुवर्ण मयूर आणि प्रमाणपत्र प्राप्त होईल. . निर्मात्याला रोख रकमे व्यतिरिक्त प्रमाणपत्र प्राप्त होईल.

2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: रौप्य मयूर , प्रमाणपत्र आणि 15,00,000/ रुपयांचे पारितोषिक

3. सर्वोत्कृष्ट अभिनेता : रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 10,00,000/- रुपयांचे पारितोषिक

4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 10,00,000/- रुपयांचे पारितोषिक

5. विशेष ज्युरी पुरस्कार:रौप्य मयूर , प्रमाणपत्र आणि 15,00,000/- रुपयांचे पारितोषिक एखाद्या चित्रपटाला (चित्रपटाच्या कोणत्याही पैलूसाठी ज्याला ज्युरी पुरस्कार /स्वीकृती देऊ इच्छितो) किंवा एखाद्या व्यक्तीला (चित्रपटातील त्याच्या/तिच्या कलात्मक योगदानासाठी) हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार एखाद्या चित्रपटाला मिळाल्यास  तो चित्रपटाच्या दिग्दर्शकाला प्रदान केला जाईल.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles