26 C
Panjim
Friday, January 28, 2022

कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर सिगल पक्षांचे आगमन

Latest Hub Encounter

कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर हजारो परदेशी पाहुणे म्हणजेच सिगल पक्षी दाखल झाले आहेत. कोकणातील दापोली तालुक्यातील केळशी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने हे पक्षी विहार करताना दिसतात. पक्षी पाहण्यासाठी आणि त्यांना आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी समुद्रकिनारी पर्यटक गर्दी करत आहेत. थंडीची चाहूल लागताच लाखो मैल प्रवास करून सिगल पक्षी कोकण किनारपट्टीवर दाखल होतात. यावर्षीही हे पक्षी दाखल झाल्याने कोकणातील पांढरे शुभ्र समुद्र किनारे, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असे मोहक रूप असलेल्या या अनोख्या पाहुण्यांमुळे फुलून गेले आहेत. सिगल पक्षांचे थवे आणि किलबिलाट अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्र किनारी गर्दी करत आहेत. पक्षांनी उडताना समुद्रातील मासे टिपणे हे दृश्य किनाऱ्यावर असलेल्या पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -