27 C
Panjim
Thursday, August 11, 2022

कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सिंधुदुर्गात ७ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा – आमदार नितेश राणे १कृषी कायद्याचा सर्वात जास्त फायदा कोकणातील शेतकऱ्यांना होईल, आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास

spot_img
spot_img

 

सिंधुदुर्ग – कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा भाजपाच्या वतीने ७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे.या मोर्चात सुमारे दहा हजार शेतकरी सहभागी होणार आहेत.हा मोर्चा मुडेडोंगरी येथून नरडवे रोडवरून प्रांत कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे.त्यात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ,भाजपा किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल भोंडे, माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,माजी मंत्री रवींद्र चव्हाण सहभागी होणार आहेत. अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोर्चात शेतकऱ्यांना स्वतःहून सहभागी व्हायचे आहे

७ जानेवारी ला कणकवलीत काढल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चाची माहिती देण्यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रहार भवन येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणालेत,या मोर्चात शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे असे शेतकरी स्वतःहून सांगत आहेत. उत्स्फुर्त असा प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांचा मिळत आहे.कोकणातील शेतकऱ्यांचा या कृषी कायद्यामुळे फायदा होत आहे.या मोर्चामुळे कोकणात, महाराष्ट्रात आणि देशात चांगला संदेश जाईल.प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे केले आहेत.त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे.

कोकणातील शेतकऱ्यांचा या कृषी कायद्यामुळे फायदा

आपल्या शेतात उत्पादित होणारा आंबा, काजू, सुपारी, भात किंवा इतर कृषी उत्पादने विक्रीसाठी कृषि उत्पादन समिती हा एकच पर्याय आज पर्यंत आम्हा शेतकऱ्यांकडे होता. मात्र आता या नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी आपला आंबा बिगबाजार, डिमार्ट,मेरा किसन, अशा कोणत्याही आंबा काजू किंवा इतर उत्पादने विक्रीकरू शकतो.म्हणजेच कृषि उत्पन्न बाजार समिती आणि इतर मार्केट असे चांगले पर्याय या कायद्या मुळे शेतकऱ्यांना मिळाले आहेत.त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना या कृषिकायद्याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे.असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होणार नाहीत

हा नवीन कायदा शेतकऱ्याला बाजरपेठ उपलब्ध करून देतो.देवगडचा आंबा बिग बाजार मंध्ये किंवा दोडामार्ग काजू गुजरात मंध्ये विकसला जाईल तेव्हा शेतकऱ्यालाच फायदा होईल. या मुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होणार नाहीत. मात्र या कांद्याला कॉग्रेस पक्ष टोकाचा विरोध करत आहेत.जर राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले आणि वायनाड मधून निवडून येऊ शकतात तर देवगड चा हापूस आंबा मध्यप्रदेशात का विकला जाणार नाही ?असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी

ट्रॅक्टर मोर्चातून शेतकऱ्यांचा पाठींबा दाखवून देऊ

देशाला महासत्तेकडे नेणारे,सामान्य शेतकऱ्याला ताकद देणारे तीन कृषी विषयक विधेयके(कायदे)प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली. त्या विध्येयकला माझ्या कणकवली-देवगड, वैभववाडी मतदार संघातील शेतकरी आणि जनतेचा किती मोठा पाठिंबा आहे हे या ट्रॅकटर मोर्चातून दाखवून देवू. आणि विधेयकाचा जयजय कर करू त्यासाठी हा मोर्चा असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img