26.6 C
Panjim
Tuesday, January 18, 2022

कुडाळ रूग्णालयात अडीच लाख रु. किमतीच्या मल्टीपॅरा माॅनिटर व इन्फ्युजन पंप या अत्याधुनिक उपकरणांचे वितरण आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा

Latest Hub Encounter

सिंधुदुर्ग – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मधून कुडाळ ग्रामीण रूग्णालयाला मल्टीपॅरा माॅनिटर व दोन इन्फ्युजन पंप अशी अत्याधुनिक उपकरणे देण्यात आली आहेत. आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. प्रमोद वालावलकर व वैद्यकीय अधिकारी डाॅ.गौरव घुर्ये यांच्याकडे आज ही उपकरणे सुपूर्द करण्यात आली.गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी या उपकरणांचा उपयोग होणार आहे.

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ ग्रामीण रूग्णालयासाठी मल्टीपॅरा माॅनिटर व इन्फ्युजन पंप या उपकरणांसाठी जिल्हा नियोजन मधून अडीच लाख रुपये मंजूर झाले होते. या निधीतून ही उपकरणे देण्यात आली आहेत.मल्टीपॅरा माॅनिटरचा उपयोग गंभीर रूग्णांच्या तपासणीसाठी होणार आहे. तर गंभीर रूग्णाला सलाईन कीती प्रमाणात देणे आवश्यक आहे. हे दाखविण्यासाठी इन्फ्युजन पंप या उपकरणाचा उपयोग होणार आहे.यापुढील काळातही कुडाळ मालवण मधील रूग्णालयात आवश्यक सर्व सोईसुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी आ.वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख राजन नाईक, सभापती सौ. नुतन आईर, उपसभापती जयभारत पालव, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, महिला आघाडी तालुका संघटक सौ.मथुरा राऊळ, संजय भोगटे, अतुल बंगे, संतोष शिरसाट, सौ.श्रेया परब, नगरसेवक सचिन काळप, गणेश भोगटे, सुशील चिंदरकर, राजू जांभेकर, कृष्णा तेली, नागेश आईर, कृष्णा धुरी, गंगाराम सडवेलकर, बाबी गुरव, मंजू फडके, राजू गवंडे, अनुप चेंदवणकर, नितीन राऊळ तसेच रूग्णालय कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -