28 C
Panjim
Sunday, October 2, 2022

कुडाळ नगराध्यक्ष पदासाठी आफ्रिन करोल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आफ्रिन करोल यांचा उमेदवारी अर्ज आमदार वैभव नाईक व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला आहे. यावेळी आ. वैभव नाईक यांनी आफ्रिन करोल यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत अभिनंदन केले. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरसेविका आफ्रिन करोल यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण एकत्रित रित्या कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. खासदार विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, ना. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून येईल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी काँग्रेस निरीक्षक गुलाबराव घोरपडे, सागर चव्हाण,काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,प्रसाद बांदेकर,आब्बास करोल,राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, सुनील भोगटे, शिवसेनेचे विकास कुडाळकर, संजय भोगटे,अतुल बंगे, सचिन काळप, नवनिर्वाचित नगरसेवक मंदार शिरसाट, ज्योती जळवी , श्रुती वर्दम , श्रेया गवंडे , सई काळप , उदय मांजरेकर , किरण शिंदे, अक्षता खटावकर, संतोष अडूळकर, अमित राणे राजू गवंडे, चेतन पडते, शोहेब खुल्ली आदिंसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img