कणकवलीत व्यवहार थांबले, व्यापार ठप्प, कोरोनाग्रस्त रुग्ण आढळताच कंटेन्मेंट झोन

0
214

 

सिंधुदुर्ग – शहरातील बाजारपेठ आणि परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सुरक्षा म्हणून हा परिसर सील केला आहे. या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडण्यास बंदी केली आहे. तसेच शहरातील साईनगरमधील 300 मीटर परिसरही कंटेन्मेंट झोनमध्ये आहे.

कणकवली शहरातील आताच्या कंटेन्मेंट झोनमध्ये 1 हजार 376 कुटुंबे राहतात. बाजारपेठ व साईनगरच्या काही भाग 10 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत सील असेल. याबाबत प्रातांधिकारी वैशाली राजमाने यांनी आदेश जारी केला आहे. कणकवली बाजारपेठेसह शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. त्यामध्ये राजेंद्र म्हापसेकर यांचे घर, गुरुकृपा अपार्टमेंट, संजय वाळके स्टॉल, विद्यामंदिर हायस्कूलकडे जाणारा रस्ता, रेशनदुकान, स्वामी डिजिटल फोटो स्टुडिओ, खरेदी विक्री संघाकडे जाणारा रस्ता, राजन वरवडेकर कॉमनसेन्स प्रिंटींग प्रेस येथून हर्णेआळीमध्ये जाणारा रस्ता, झेडा चौक खानोलकर पतंजली दुकान पवन नॉव्हेल्टी दुकान ढालकाठीकडे जाणारा बाजारपेठ रस्ता, हरी महादेव सुतार घर शेखर दिंगबर उचले मारूतीमंदिरकडे जाणारा रस्ता, हरि निखार्गे घर रवि खोचरे घर पटकीदेवी मंदिरकडे जाणारा बाजारपेठ रस्ता, गंगा सिंधु अपार्टमेंट व इमारतीमधील व्यापारी गाळे, स्नेहल निवास अशोक सावंत यांचे घर परिसर या भागांचा समावेश आहे.

साईनगरातील साईपूजा अपार्टमेंट ते साईशब्द अपार्टमेंट अशा 300 मीटर परिसरातील 65 घरांचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्‍यक सेवा, वस्तू विक्री ही 10 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here