सामानात जाहिरात आली म्हणजे शिवसेनेची भूमिका बदलली अस समजू नका. नाणार प्रकल्पाला आमचा विरोध आहे आणि तो कायाम राहणार, हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही. शिवसेनेची भूमिका मी ठरवतो जाहिरातदार नाही. असे सांगतानाच एल्गार व भीमा कोरेगांव दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. भीमा कोरेगांवचा तपास केंद्राकडे देणार नाही. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या विकासासाठी सिंधू-रत्न योजना सुरु करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. नाणार रिफायनरीबाबत शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनातून जाहिरात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱयावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाणारबाबतची भूमिका स्पष्ट केली.
एलईडी मासेमारी बंद करण्यासाठी प्रयत्न करणार, कोकणात एलईडी मासेमारीमुळे दुष्काळ निर्माण होतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोस्टगार्डशी चर्चा केली असून त्यातून मार्ग काढण्यात येणार आहे. तसेच एल्गार व भीमा कोरेगांव दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. भीमा कोरेगांवचा तपास केंद्राकडे देणार नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं.