27 C
Panjim
Tuesday, October 20, 2020

उमेद अभियान वाचावा, सह्याद्री प्रभागसंघ फोंडाघाटच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

Must read

महाराष्ट्राच्या राज्य पक्षाला सिंधुदुर्गमधील पक्षी निरीक्षकाने दिले जीवदान मालवण येथे सापडला होता हा पक्षी जखमी अवस्थेत

सिंधुदुर्ग - महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून ओळख असलेला हरियाल पक्षी जखमी असवस्थेत मालवणमधील पक्षी निरीक्षक उदय रोगे यांना सापडला. त्यांनी या हरियाल पक्षांवर उपचार...

COVID-19: 285 new cases, six deaths

Panaji: Goa’s COVID-19 caseload went up by 285 and death toll by six on Tuesday, while 361 people were discharged, an official said. The state...

GPSC to hold Screening Test for JUNIOR SCALE OFFICER aspirants in November 2020

Panaji: The Computer Based Recruitment Test ( CBRT) which was to be conducted by GPSC for selection of Junior scale officers on 29th March...

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणातील गोव्यातील दारू सप्लायरलाही अटक

सिंधुदुर्ग - तेरा लाख रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतूक प्रकरणातील दारू सप्लायर (मालक )दीपेश पुंजा पटनी ( वय 31, रा. कामोठे नवी...
- Advertisement -

सिंधुदुर्ग – उमेद अभियान वाचावा, ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधीपासून दूर नेऊ नका अशी मागणी करत आज सह्याद्री प्रभागसंघ फोंडाघाटच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.

यावेळी विस्तार अधिकारी रवी मेस्त्री, सह्याद्री प्रभागसंघ फोंडाघाटच्या अध्यक्ष मनीषा राणे, सदस्य प्राची देसाई, सीआरपी ताई दिशा वंजारे, सोनाली कोदे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात हे अभियान उशिरा सुरु झाले त्यामुळे अभियानाचा लाभ या तालुक्याला फारसा झालेला नाही. तरी शासनाने याही गोष्टींचा विचार करायला हवा असे मत या महिलांनी मांडले.

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सन २०१३ पासुन उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हृयामध्ये उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समूह सक्षमीकरणाची (बचत गट) प्रभावीपणे अंमलबजावणी होवून स्वयंसहाय्यता समूहाचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतून लाखो कुटुंब उमेद अभियानाला जोडली गेलेली असून त्यामूळे गरीब कुटूंबांना रोजगार व उत्पन्न वाढीच्या संधी प्राप्त होवून त्यांचे जीवनमान उंचावन्यास सुरुवात झालेली आहे. मात्र हे ज्या कर्मचाऱ्यांनी घडवून आणलं त्या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश आल्यामुळे सध्यस्थितीत चार हजारहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हे अभियान राबवून महिलांना स्वयंरोजगाराचा आत्मविश्वास दिला त्या अधीकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आता या महिला भगिनी उभ्या राहिल्या आहेत. आशेची त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी आपले मत मांडताना या महिला म्हणाल्या की उमेद अभियानातील या सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे, तेव्हा आता त्यांना शासन जर कमी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारण या लोकांनी आम्हाला संघटित करून नवा विचार दिला आहे. त्यामुळे शासनाला जर या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर आम्ही देतो मात्र या अधिकाऱ्यांना काढून हे अभियान बंद करू नये अशी मागणी या महिलांनी केली आहे.

- Advertisement -

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article

महाराष्ट्राच्या राज्य पक्षाला सिंधुदुर्गमधील पक्षी निरीक्षकाने दिले जीवदान मालवण येथे सापडला होता हा पक्षी जखमी अवस्थेत

सिंधुदुर्ग - महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून ओळख असलेला हरियाल पक्षी जखमी असवस्थेत मालवणमधील पक्षी निरीक्षक उदय रोगे यांना सापडला. त्यांनी या हरियाल पक्षांवर उपचार...

COVID-19: 285 new cases, six deaths

Panaji: Goa’s COVID-19 caseload went up by 285 and death toll by six on Tuesday, while 361 people were discharged, an official said. The state...

GPSC to hold Screening Test for JUNIOR SCALE OFFICER aspirants in November 2020

Panaji: The Computer Based Recruitment Test ( CBRT) which was to be conducted by GPSC for selection of Junior scale officers on 29th March...

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणातील गोव्यातील दारू सप्लायरलाही अटक

सिंधुदुर्ग - तेरा लाख रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतूक प्रकरणातील दारू सप्लायर (मालक )दीपेश पुंजा पटनी ( वय 31, रा. कामोठे नवी...

Other issues to focus on, rather than hurrying with double-tracking of rails, Alexio Reginaldo to govt

Panaji: Commenting on the protest at Vasco hearing held on Sunday Curtorim MLA Alexio Reginaldo took a dig at the government and said,"In times...