सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ल्यात हायकोर्टाने आ.नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असून 27 जानेवारी पर्यंत अटक न करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक करू नये, यासंदर्भात हायकोर्टात पुन्हा पिटीशन दाखल केले होते.
सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून तोवर अटक करू नये, असे नितेश राणे यांच्या वकिलांनी म्हणणे मांडले. त्यानुसार 27 जानेवारी पर्यंत आ. नितेश राणेंना अटक करू नये, असे आदेश देत हायकोर्टाने नितेश राणेंना दिलासा दिला आहे.