28.3 C
Panjim
Thursday, May 19, 2022

आमदार नितेश राणे यांना शिवसैनिका वरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांची चौकशीसाठी हजर राहण्याकरिता नोटीस सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापले

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांना कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशी करता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शनिवारी 18 डिसेंबर रोजी परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते.

अज्ञातांनी केला हल्ला

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले आहेत. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकल ला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत; सतीश सावंत यांचा आरोप

जिल्हा बँक निवडणुकीतील माझे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या भाडोत्री गुंडांनी केल्याचे सांगत या हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा बँक निवडणूक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला. जिल्हा बँक निवडणुक दहशतवादाने जिंकण्याचा राणेंचा डाव असल्याचंही सावंत म्हणाले. 2015 साली राणेंची साथ सोडणाऱ्या राजन तेलींवर अशाच प्रकारे सावंतवाडी रेस्ट हाऊसमध्ये हल्ला झाला होता. सहकार क्षेत्रात खुनी हल्ले करून दशतवादाने जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा राणेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जनता राणेंच्या या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल, असे सावंत म्हणाले होते.

खुनी हल्ल्याचे सूत्रधार असलेल्या राणेंना चोख प्रत्युत्तर देणार – आमदार वैभव नाईक

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेत चांगले काम केले असून जिल्हा बँकेत पराभावाच्या भीतीने नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करून जिल्हा बँक सारख्या सहकार निवडणुकीत राणे दहशत निर्माण करत आहेत. मात्र या दहशतीला शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला होता.

आमदार राणे यांना पोलिसांची नोटीस

दरम्यान याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी चौकशी ला हजर राहण्याचे नोटीस बजावली आहे. आमदार राणे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून या चौकशी करता हजर राहतात का हे अद्यापही समजले नाही. दरम्यान या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून पोलिसांनी चौकशी ला बोलावले असल्याने आपण त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत असे राणे म्हणाले आहेत.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img