29 C
Panjim
Monday, March 27, 2023

आमदार दिपक केसरकर स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन करा, भाजपा तुमच्या पाठीशी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मांडली आपली भूमिका

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – चांदा ते बांदा योजनेतील जिल्ह्याला प्राप्त झालेले 93 कोटी रुपये आतापर्यंत सरकारने मागे घेतलेले आहेत. ही योजना बंद झाली तर आंदोलन करणार असे केसरकर म्हणाले होते. तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अन्यत्र हलविण्याच्या प्रयत्नातून सेनेचे जिल्ह्यातील नेते केसरकरांविरोधात षडयंत्र करताना दिसत आहेत. त्यामुळे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करावं. जिल्हा भाजपा त्यांच्या पाठीशी आहे अशी भूमिका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मांडली आहे.

शिवसेनेचे आमदार असूनही आ. दीपक केसरकर यांना शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. या आधी चांदा ते बांदा योजनेचा निधी परत घेऊन केसरकरांना शह देण्यात आला होता. आता केसरकरांनी सावंतवाडीत भूमिपूजन केलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अन्यत्र हलविण्याच्या प्रयत्नातून सेनेचे जिल्ह्यातील नेते केसरकरांविरोधात षडयंत्र करताना दिसत आहेत. त्यामुळे आता केसरकरांनी या अन्याया विरोधात दंड थोपटून आंदोलन करावे भाजप त्यांना पूर्ण पाठिंबा देईल, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.

जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना सरसकट जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करून प्रशासन सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर आणण्याचे काम करीत आहे.आधीच होरपळलेल्या जनतेला त्यामुळे अधिकच त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे भाजप नक्कीच याविरोधात आवाज उठवेल. वेळ पडल्यास भाजप आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या राज्यातील सत्तेत सहभागी आहेत त्यामुळे त्यांनी साकारलेली आंदोलने म्हणजे निव्वळ देखावा आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. सत्तेत असलेले आमदार वैभव नाईक स्वतःच्याच प्रांताधिकारी यांच्या विरोधात घेतलेली भूमिकाही जनतेची निव्वळ फसवणूक आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुकाध्यक्ष महेश धुरी, न.प. सभापती ॲड. परिमल नाईक, नगरसेवक उदय नाईक, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर बांदा सरपंच अक्रम खान, केतन आजगांवकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles