27 C
Panjim
Friday, September 30, 2022

आमच्या भानगडीत पडू नका, नखं लावाल तर फाडून टाकू निलेश राणेंचा केसरकरांना इशारा; डोक्याचा वरचा मजला रिकामी झाल्याचा आरोप

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – आम्ही ठाकरेंचं ऐकलं नाही तर केसरकर तुमचं काय ऐकणार. दीपक केसरकर यांनी आपल्या औकातीत रहाव, आम्हाला नखं लावाल तर फाडून टाकू, असा इशारा माजी खासदार तथा भाजपचे युवा नेते निलेश राणे यांनी दिला आहे. दरम्यान केसरकर यांचा वरचा मजला रिकामा आहे. त्यांना मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते एक वेळ ठाकरेंच्या विरोधात बोलतात, तर काही वेळाने त्यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे त्यांनी औकातीत राहून बोलावे, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

निलेश राणे यांनी सकाळी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आमदार केसरकर यांच्यावर टीका केली होती. यावेळी आमच्या सोबत काम करायचे आहे, असे सांगणाऱ्या केसरकारांसाठी आपल्या ड्रायव्हरची जागा १ तारीख पासून रिकामी आहे. त्या ठिकाणी तुम्ही या, असा सल्ला दिला होता. परंतु काही वेळाने त्यांनी सिंधुदुर्ग मध्ये बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते यात ते म्हणाले, केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून काम करत असताना आपण कोणीतरी मोठे झाल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या डोक्याचा वरचा मजला रिकामी झाला आहे. त्यांना मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते एक वेळ ठाकरेंच्या विरोधात बोलतात आणि काही वेळाने त्यांच्या बाजूला बोलतात. त्यामुळे त्यांना नेमके काय बोलायचे आहे, तेच कळत नाही.

राणे पुढे म्हणाले, ते आमच्या सोबत काम करणाऱ्यास तयार आहेत, असे सांगत आहेत. परंतु हे आमच्या सोबत काम करणार त्यामुळे आम्ही थांबलो होतो असा अर्थ होतो. परंतु आम्हाला त्यांची गरज नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांची ताकद आणि अवकात काय आहे. हे आम्ही त्यांना वेळोवेळी दाखवून दिले आहे. उगाच आमच्या भानगडीत पडू नका, अन्यथा नख लावाल तर फाडून टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान सुशांत सिंग व दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे व राणे कुटुंबाकडून आरोप करण्यात आले, असे म्हणणाऱ्या केसरकरांनी न्यायालयात नेमकी कोणाचे नाव पुढे आले, याचा अभ्यास करावा नंतरच बोलावे, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img