सिंधुदुर्ग – आंबोली घाटाची दुरावस्था, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, चौकुळ बेरडकी रस्ता, मळगाव घाट रस्ता आदींबाबत जाब विचारत धारेवर धरलं. आंबोली घाटात दरड कोसळत असून गटार, नालेसफाई झालेली नाही. यामुळेच ही दरड कोसळत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना घेराव घालण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उपजिल्हा रुग्णालयातील अर्धवट कामाबाबत, चौकुळ बेरडकी रस्ता कामात झालेलं निकृष्ट दर्जाचे काम, मळगाव घाट रस्ता दुरुस्ती आदीकडे त्यांचं लक्ष वेधल. यावेळी कार्यकारी अभियंता माने यांनी आंबोली, चौकुळ बेरडकी इथं उद्या प्रत्यक्ष पहाणी करण्याच आश्वासन दिल. तर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची वर्क ऑर्डर ८ दिवसांत काढण्याची ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या सह शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, राजू धारपवार, दर्शना बाबर-देसाई,बावतीस फर्नांडिस, नंदू साटेलकर, आसिफ शेख, सुरेश वडार, अर्षद बेग, जहिरा ख्वाजा, आसिफ ख्वाजा, नंदकिशोर नाईक, इफ्तिकार राजगुरू, याकुब शेख, कौस्तुभ नाईक आदी उपस्थित होते.