28 C
Panjim
Thursday, May 19, 2022

अवैध सिलिका उत्खनन आणि वाहतूक व्यावसायिकांचे धाबे दणाणले, फोंडाघाट चेकनाक्यावर 24 तास महसूल-पोलीस विभागाचा पहारा

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यात अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांचे आता धाबे दणाणले आहेत.

कारण फोंडाघाट चेक नाक्यावर जिल्हाधिकारी व उपविभागीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी फोंडाघाटचेक नाक्यावर 24 तास महसुल विभागाचा पहारा ठेवत मंडळ अधिकारी व तलाठी यांची नेमणूक करून पोलीस कर्मचारी पतक तैनात केले आहे.

त्यामुळे दिवसभरात येणाऱ्या वाळू डंपरचे अधिकृत पास आहेत काय व इतर नोंदणीकृत कागदपत्रांची तपासनी केली जात असून योग्य कागदपत्रांची खात्री केल्यानंतरच डंपर सोडले जात आहेत.

दोन दिवसापूर्वी कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून उपविभागीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध सिलिका वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई केली.

त्यानंतर अवैध वाहतूक होऊ नये यासाठी फोंडाघाट चेक नाका येथे 24 तास महसूल विभागाचे पथक तैनात करत अवैध वाळू व्यवसायिकांना आता लगाम घालण्याचे काम कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी हाती घेतल्याचे दिसत आहे

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img